In this poem poetess says, I want to live together with my dear persons. But I want my space also. I want free and happy life. I wish, all people should live happily with their dear persons. They should get their space. I want to speak and write as per my wish.
स्वतंत्रतेचा माझा बाणा
सदैव जपते माझ्यासाठी!
माझ्यासाठी, तुमच्यासाठी!!
आत्म्याच्या निर्भरतेसाठी!!!
तनामनाला जपता जपता,
क्षण सुंदर साठवले हृदयी,
साज धरेचा विणण्यासाठी!
फुलात अत्तर भरण्यासाठी!!
फळास गोडी देण्यासाठी!!!
काळोखालासुद्धा जपले,
रंग उषेला देण्यासाठी!
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी!!
माझ्यासाठी माझ्यासाठी!!!