माठ ठेवण्या तिवई आहे
सूर भराया सनई आहे
परसदारच्या विहिरीजवळी
अळू शेवगा पपई आहे
रसरसलेले चुल्हाण त्यावर
लोखण्डाची कढई आहे
ठोक्याचे पितळी पातेले
आतुन त्याला कल्हई आहे
चिंच मीठ लिंबाने लखलख
झळाळणारी समई आहे
शकुन सांगण्या काऊ आण्णा
कोकिळ भाऊ गवई आहे
सय पणजीची मऊ मुलायम
फुलाफुलांची रजई आहे