पृथ्वीवरची सून व्हायचे स्वप्न परी बघते
आकाशी सूर्यासंगे ती तापाया बसते
दसरा सण मोठा आल्यावर दिसे निळावंती
झेंडू चाफा शेवंतीचा ढीग उभा करते
सासूबाई कडक दामिनी ढग्गोबाईची
अग्गो वहिनी नणंद ताई खुदूखुदू हसते
नक्षत्रे अन चंद्रासंगे निशा गीत गाई
तरणीताठी कृष्ण चांदणी नभात चमचमते
धूमकेतु अन इंद्रधनूवर बसून झुलताना
गझला लिहिण्या बॉन्ड “सुनेत्रा” कधीच ना डरते
गझल मात्रावृत्त – मात्रा २६