फुलात असतो सुगंध जो तो कुपीत भरता होते अत्तर
प्रियतम माझा माझ्या संगे प्रीत तयावर माझी कट्टर
फुले बाल अन तरुण साजिरी सुकल्यावरती अपसुक गळती
त्यांना नसते वृद्धावस्था साठी आणिक वय बिय सत्तर
सप्तरंग धाग्यात भरोनी एक सुबकशी विणून पिशवी
वह्या पुस्तके मोरपिसे मी तयात भरता होते दप्तर
पाषाणाला ठोक ठोकुनी शिल्पी छिन्नीने घडवीता
देव प्रकटतो मूर्तीमध्ये भाव जाणतो हसतो पत्थर
नैया चालवणारी नाविक मुकी आंधळी बहिरी ना मी
मम आत्म्यावर माझी श्रद्धा फोडिन लाटा देउन टक्कर
गझल मात्रावृत्त (मात्रा ३२)