कुणी तरी का तुला म्हणू मी
अनोळखी का तुला म्हणू मी
फुलाप्रमाणे हृदय तुझे हे
जडी बुटी का तुला म्हणू मी
सदैव असशी मनात माझ्या
जळीस्थळी का तुला म्हणू मी
मधुघट अक्षय मला दिले तू
कडू गुटी का तुला म्हणू मी
सलील निर्झर प्रपात असुनी
दरी गिरी का तुला म्हणू मी
नवमत वादी विचार तू तर
सनातनी का तुला म्हणू मी
घडीत हसशी घडीत रडशी
तरी यती का तुला म्हणू मी
अजाणता तू चुका न केल्या
खरा तरी का तुला म्हणू मी
सरळ ‘सुनेत्रा’ तुला न कळली
तरी गणी का तुला म्हणू मी
लगावली – लगालगागा/लगालगागा/
One response to “अनोळखी – ANOLAKHEE”
khuuuupch mast ! 🙂 love it !!!!