आज मतला थरथरे हा बावरा
बावरोनी होतसे हा लाजरा
नाचताती शेरणी गझलेमधे
शेर बब्बर गुरगुरे मग नाचरा
हाय मज हा छंद पुन्हा लागला
पाठ म्हणते तू विसावा घे जरा
काळ वेडा कालचा झाला जुना
माझियावर फोडिशी का खापरा
पाठ माझी जाहली रे मोकळी
जाळता मी शुभ्र नीतळ कापरा
काफिया तू मौन आता सोडना
बावऱ्या झाल्यात साऱ्या अप्सरा
मस्त सुंदर भाव लपले अंतरी
गात तो नाही जरी आहे खरा
गझल – मात्रा १९
लगावली – गालगागा/गालगागा/गालगा/ गझलेमधे