आजकाल बोलण्यास सवड नाय ऐकण्यास
कोण का म्हणेल सांग ये निवांत भेटण्यास
वेळ ना तयांस अन्न रांधण्यास खावयास
पण सदा तयार तेच शर्यतीत धावण्यास
खर्च जाहल्यावरी हिशेब चोख ठेवतात
गुप्त फुकट जे मिळेल ते बसून लाटण्यास
रंगरूप बदलतात हायफाय वागतात
जोखती दुजांस फक्त आरशास टाळण्यास
टापटीप राहतात लाजतात ते श्रमांस
लाजकाज सोडतात फक्त पाय चाटण्यास
वृत्त – चंचला, मात्रा २४
लगावली – गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/