बाळगणेशा रूप साजिरे
बाळगणेशा खूप साजिरे
विघ्नविनाशक श्रावणी सरी
बाळगणेशा धूप साजिरे
कढवुन लोणी शुभ्र मिळविले
बाळगणेशा तूप साजिरे
जोहड विहिरी आड देखणे
बाळगणेशा कूप साजिरे
पाखडण्या धान्यास आणिले
बाळगणेशा सूप साजिरे
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १६)
लगावली – गाललगागा/गालगालगा/