आनंद अज्ञानातही असतो कधी
माणूस तेव्हा त्यातही रमतो कधी
नाही जरी त्याला जमे झरणे पुन्हा
फुलवावया वृद्धांस तो झरतो कधी
शोधावया कोणा जरी फिरतो सदा
माझे तरी नाही कुणी म्हणतो सदा
कोणावरी केली न प्रीती सांगतो
मौनातल्या बिंबात का बुडतो कधी
जिंकावया निघतो जगा शस्त्रांसवे
गोष्टीतल्या युद्धातही हरतो कधी
खेळात आता खेळ नाही वाटता
लांबून सारा खेळ तो बघतो कधी
झाले सुनेत्रा वय अता म्हणुनी मला
नाही जरी नटणे बरे नटतो कधी
गझल – मात्रा २१
लगावली – गागालगा/ ३ वेळा