आम्रकुष्मांडी दिपाणी कुष्मांडीनी
टांकसाळी पाड नाणी कुष्मांडीनी
आम्रकुष्मांडी कमानी कुष्मांडीनी
खोदते झोकात खाणी कुष्मांडीनी
आम्रकुष्मांडी दिवाणी कुष्मांडीनी
परजते तलवार राणी कुष्मांडीनी
आम्रकुष्मांडी शहाणी कुष्मांडीनी
गातसे कैफात गाणी कुष्मांडीनी
आम्रकुष्मांडी भवानी कुष्मांडीनी
कृष्णवर्णी दिव्य बाणी कुष्मांडीनी
गझल अक्षरगण वृत्त (मात्रा २२)
लगावली – गालगागा/ २ वेळा गागा/ ४ वेळा