बोलती कावळे आस आहे
कोणती नाकळे आस आहे
काक ना स्पर्शिती पिंड जेव्हा
सांगती बावळे आस आहे
पाहती चोरुनी जे नको ते
ते जरी सोवळे आस आहे
मंदिरी अंतरी ज्योत तेवे
भिंत का काजळे आस आहे
आवळे वाटुनी चोरलेले
लाटती कोहळे आस आहे
वृत्त – भामिनी
लगावली – गा ल गा/गा ल गा/ गा ल गा गा