इंद्रधनुष्य हा शब्द गुंफलेले वेगवेगळ्या वृत्तातील सात शेर(मतल्याचे)
इंद्रधनुष्यातील रंग मी पेरित गेले मातीत
उगवुन आले रंगीत हात विणण्या झेले मातीत
क्षितिजावर ये इंद्रधनुष्या बसेन तुझिया पंखांवरती
सप्तसुरांचे धागे जोडत झुलेन तुझिया पंखांवरती
इंद्रधनुष्या दे तव मजला रंग उधळण्या
देइन मी तुज गझलेमधले ढंग उधळण्या
मृगजळ आणिक इंद्रधनुष्याला मी केव्हा माया म्हटले होते
कलम जादुई दवात बुडवुन सागरतीरी चित्र रेखले होते
हिरवा पिवळा नारिंगी अन लाल निळा जांभळा पारवा
इंद्रधनुष्या सात रंग तव उधळित फिरतो खुळा पारवा
सात रंग ताव इंद्रधनुष्या गझलेमधले शेर जणू
असे धावती वहीवरी मम् जंगलातले शेर जणू
इंद्रधनुष्यामधून माझ्या तीर सोडते रंगभरे
भिजवाया हृदयांना दगडी नीर धावते रंगभरे