प्राक्तन माझे गुलाम बनले
मम आत्म्याच्या चरणी झुकले
शून्य जाहल्या पंचभुतांना
भविष्य माझे पुरून उरले
उधाणलेल्या समुद्रात मन
नाजुक उदकाडीवर तरले
झरलेले मम अक्षर अक्षर
शुभ्र कर्पुरासमान जळले
लेखणीस मम वंदन करण्या
कर जोडुन मी डोळे मिटले
प्राक्तन माझे गुलाम बनले
मम आत्म्याच्या चरणी झुकले
शून्य जाहल्या पंचभुतांना
भविष्य माझे पुरून उरले
उधाणलेल्या समुद्रात मन
नाजुक उदकाडीवर तरले
झरलेले मम अक्षर अक्षर
शुभ्र कर्पुरासमान जळले
लेखणीस मम वंदन करण्या
कर जोडुन मी डोळे मिटले