जे मला पटेल तेच करेन मी
जाळुनी पूरून हाव उरेन मी
तूच बेजबाबदार नको म्हणू
सांडली तशीच प्रीत भरेन मी
पोहताच कालव्यात रुबाब का?
सागरात भोवऱ्यात तरेन मी
तू तुझा अहं गडे कुरवाळिशी
जिंकताच ‘मी’पणास हरेन मी
कागदी फुले जरी चुरगाळिली
आजही बनून दुःख झरेन मी
आठवांस त्या सुरेल अजूनही
कोंडुनी रचून गीत स्मरेन मी
वावरात फेकुनी बुजगावणे
भावभोर अंबरास वरेन मी
वृत्त – गा ल गा ल , गा ल गा ल, ल गा ल गा.
One response to “उरेन मी – UREN MEE”
सुंदर गझल!
संथ लय व क्रुतनिश्तयाचा आशय हे रसायन खासच परिणामकारक ..: