अयोग्य काही केले मी जर जाणवले मजला
स्वीकारुन मी केले सुंदर जाणवले मजला
काळ्या काळ्या नेत्री काजळ घालुन मी बघता
चांदण भरले जळले अंबर जाणवले मजला
वृषभ जयाचे लांच्छन तो तर ऋषभदेव शंभू
आदिनाथ पहिला तीर्थंकर जाणवले मजला
सत्यशोधनासाठी होता पंचम काळी पण
महावीराचा आत्मसंगर जाणवले मजला
दवबिंदूंची स्फटिकमण्यांसम करी माळ येता
शंकर शंकर जपतो कंकर जाणवले मजला
गझल मात्रावृत्त (मात्रा २६… १६/१०)