एकदाच फक्त सांग माझियात काय खास
मापट्या समान नाक की सुडौल पाय खास
पात हरित करकरीत सळसळे खुल्या उन्हात
जणु उनाड चंचला म्हणे सुरात हाय खास
भाज पात फोडणीत लाल तिखट मीठ वरुन
डाळ घाल पीठ पेर आर्द्रता भराय खास
अक्षरात इंग्रजी सजेल गझल घाटदार
त्यात मस्त झेड केंद्र गुप्त एक्स वाय खास
तेहतीस कोट देव दर्शनास गोधनात
ही नवीन त्यातलीच एक शुभ्र गाय खास
गझल वजनदार मी हरेक शेर स्निग्ध शांत
तापल्या दुधावरी जणू रवाळ दाट साय
वृत्त – चंचला, मात्र २४
लगावली – गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/