ज्या गुलाबी वादळाचे नाव ओखी
त्या नबाबी वादळाचे नाव ओखी
प्रश्न झेलत उत्तरांसव गरजणाऱ्या
धबधबाबी वादळाचे नाव ओखी
चिंब साकीला कराया धडकते जे
त्या शराबी वादळाचे नाव ओखी
घुसळुनी मृदगंध हृदयी झिंगणाऱ्या
मम् शबाबी वादळाचे नाव ओखी
सागरी लाटांपुढे जे ना झुके रे
त्या रुबाबी वादळाचे नाव ओखी
गझल अक्षरगण वृत्त
गालगागा/४ वेळा