कन्यादान – KANYAA DAAN


लग्नविधीतिल शब्द खटकतो कन्यादान
कन्या म्हणजे वस्तू नाही आत्मा जाण

हात असावा हातामध्ये कशास गाठ
विसरुन ओट्यांची गाठोडी व्हावे गान

स्वतंत्रता आत्म्यांची जाणुन द्यावी साथ
परंपरेतिल अस्सल जपण्या यावे भान

मैत्री प्रीती दोन जिवांची वाढायास
कर्तृत्वाने वाढो दोन्ही घरची शान

प्रत्यंचा धनुराची ताणुन धरता नेम
मुक्तिपथावर ऊर्ध्वगतीने जातो बाण


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.