कविता माझी बोलत असते माझ्यासंगे
कविता माझी भांडत असते माझ्यासंगे
भूक लागता कडकडुनी मज लपवुनी कागद
कविता माझी जेवत असते माझ्यासंगे
चिंब भिजविता भाव भावना सुकण्यासाठी
कविता माझी वाळत असते माझ्यासंगे
कविता म्हणजे व्यक्ती नाही अंतर माझे
कविता माझी पाहत असते माझ्यासंगे
अंतरातली साद ऐकण्या साद घालुनी
कविता माझी ऐकत असते माझ्यासंगे
अमूल्य माझे हृदय विसरले कोठे मी ते
कविता माझी शोधत असते माझ्यासंगे
नाजुक साजुक गझल लिहाया मस्त ‘सुनेत्रा’
कविता माझी नाचत असते माझ्यासंगे
गझल मात्रावृत्त – २४ मात्रा