अजूनी उरी हे जुने दुःख ताजे
कुणी पेटवीले पुन्हा शेत त्याचे
मुक्याने किती यातना सोसल्या तू
अता वारियाने सुके पान वाजे
इथे कागदी नाव पाण्यात माझी
तिथे सागराची निळी लाट गाजे
हिऱ्या-माणकांचा मला सोस नाही
मला भावते फक्त निर्भेळ नाते
नको भेट तुमची नको मैफिलीही
इथे या वहीवर गझल मुक्त नाचे
तुम्ही अर्थ काढा तुम्ही नियम ठरवा
कवीकूल तुमचे तुम्ही खास राजे
वृत्त – भुजंगप्रयात, मात्रा २०
लगावली – ल गा गा /ल गा गा/ ल गा गा /ल गा गा