काकतालीय न्यायाने सुख न कुणा मिळते
अंतर्दृष्टी ज्याची उघडे सुख त्याला मिळते
जीव मुमुक्षू मुक्तीला उत्सुक मिळवाया
विपरीतरुपी मिथ्यात्वा परिक्रमा मिळते
आस्वादाने प्रत्यक्षे इंद्रिय सुख लाभे
शब्दफुलोरा रचल्याने कधीच ना मिळते
दगड फेकता शांत तळी वीचिमाला त्यात
संकल्पाने विकल्प धन चित्ताला मिळते
शरीर सुंदर कुरुप असो व्यक्ती ना तैशी
सत्य शिव रुपी चित्ताला सुंदरता मिळते
मात्रावृत्त (१४+१०=२४मात्रा)
One response to “काकतालीय – KAAK TAALEEY”
अप्रतिम रचना