काजळ – KAAJAL


नागिण कृष्णा चिद्घनचपला लखलखणारी
एक गुलछडी निशिगंधेची दरवळणारी
मिणमिणत्या पणतीसम तेवत तेल संपता
काजळ होण्या कू नयनातिल काजळणारी
नयन जलाशय तुडुंब भरता काठ सोडुनी
खडकांमधुनी निर्झरबाला खळखळणारी
मुक्त व्हावया अधरांमधुनी शीळ घालुनी
लहर हवेची श्वासामधुनी सळसळणारी
देहाग्नीच्या भट्टीमध्ये तपवुन तापुन
हृदयामधल्या शुद्धात्म्यासह झळझळणारी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.