कालसर्प कुंडलीत त्यास फक्त ठेचणार
जो असेल देवळात त्यास नित्य पूजणार
बंगल्यात झोपडीत जर फिरे भुजंग साप
सर्पमित्र होत त्यास वाटिकेत धाडणार
केवडा बनात नाग मस्त राहती निवांत
नागिणींसवे तिथेच ते मजेत डोलणार
माणसे भिऊन त्यास तो भिऊन माणसांस
छेडल्याविना कुणा कधीन सर्प चावणार
श्रावणात पंचमीस वारुळास जाय पोर
त्या अजाण बालिकेस शिक्षणास जुंपणार
वृत्त – चंचला, मात्र २४
लगावली – गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/