काळ्या काळया विठोबाला दंडवत माझा
काळया काळया उजेडाला गंडवत माझा
नमस्कार हातांची दो घडी घालुनीया
काळ्या काळया रखुमाईस बंडवत माझा
मोक्ष मिळायाला केला सत्याचा प्रयोग
काळ्या काळ्या कायेवरी भंडवत माझा
जीव मौनी अभय होण्या भव्य राजवाडा
काळ्या काळ्या शासकांना फंडवत माझा
पाहतेय श्रद्धेने मी मूर्त रूप आत्मा
काळया काळया पाषाणात खंडवत माझा
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)