ती मूढ जान्हवी हेकट जानू बाई
आंधळी जाहली वृद्धा कानू बाई
मृदु माय सावली भूतकरांची माता
पण तीच गुणाची पणती तानू बाई
फुलमाळ जयाची गळा घालण्यासाठी
सानशी खार ती धावे चानू ताई
कैवल्य चारुता मीर चंद्रमा दावी
तंबोरा जुळवी मीरा गानू बाई
बोलते सारखे, तुज “काहीहीहां श्री”
भानावर ये श्री… म्हणते भानू बाई
मात्रावृत्त – २२ मात्रा