कुलुपांसाठी किल्ल्या बनवे की पर्सन मी
मोह न मजला कुठला झुकवे की पर्सन मी
कलम फिरवुनी कड्या उचकटे उखडे झटपट
अजस्त्र टाळा खोलुन हलवे की पर्सन मी
टाळ्याला अभिषेक घृताचा वेदीवरती
मनोज्ञ दर्शन भक्तां घडवे की पर्सन मी
शांती तृप्ती मिळण्या जीवा कैक प्रकारे
मंदिरातली घंटा बडवे की पर्सन मी
चोरांच्या उलट्या बोंबांना बुकलून छान
शिमग्याच्या होळीत नागवे की पर्सन मी
गझल मात्रावृत्त मात्रा २४ (१६+८)किंवा (८+८+८)