करी कुंचला सहज घेऊनी…
रंगामध्ये पूर्ण बुडवूनी…
सहज सहज फटकारे मारून …
चित्र एक साकारे त्यातून…
भिजव भिजवले त्यास चिंबूनी …
रंगांवरती रंग उडवूनी …
भिजला कागद… भिजली पाने…
नवरंगांनी सजली पाने…
अनेकान्त भावांची किमया…
जणु पौषाची धारा तनया ….
रंग आप अन भाव मनातील …
करी उतरता …भिजतो कागद…
सुकतो… भिजतो…
पानावरती चित्र उमटते…
जीव पाहतो… जीव जाणतो…
साक्षी भावे…
उलटत पाने..
कधी उमटती…
पानांवरती… चित्रे त्यातून…
बघता त्यांची …
बिंबीत छाया … …..
ही तर सृष्टीची माया..
. ही तर सृष्टीची काया,,,,