खिडकीतुनी काय दिसे….
सांग मना सांग तुला …
कौलारू घर निवांत …
झोपलाय प्रहर शांत …
या इथे पण पहा …
वाऱ्याने सळसळता …
पिंपळ बघ हसत उभा …
पिंपळ करी सळसळ बघ …
सोड वृथा हळहळ बघ …
घे जगून क्षण पकड …
उघड उघड … दार उघड…
पिंपळ हा सांगतसे …
विसर शब्द … विसर गीत …
सांगतसे डुलत डुलत …
हळू हळू बोल बोल …
माझ्यासम डोल डोल …
उतर आत
खोल खोल….