जुन्या त्या घरांची स्मृती साद घाली
खरी देवपूजा कृती साद घाली
कुणा वासनांनी पुरे घेरलेले
मला भावना प्रकृती साद घाली
जरी ते हिशेबी तरी नवल घडले
तयां साधना संस्कृती साद घाली
मुक्या जाणिवांचा नवा अर्थ कळला
अता नेणिवा जागृती साद घाली
जरी तो अस्पर्शी निराकार आहे
तुला मूर्त ती आकृती साद घाली
वृत्त – भुजंगप्रयात, मात्रा २०
लगावली – ल गा गा/ल गा गा/ल गा गा/ल गा गा/