ठेव जपूनी मधुघट भरलेले तव अधरी
अधरामधल्या बोलांनी भर हृदय घागरी
मौनामधल्या भावभावना उसळुन येता
अलबत येते गाजत भरती शुद्ध अंतरी
गलबत येता मालाने गजबजते बंदर
निवडक मालालाच त्यातल्या ठेव आगरी
हस्तलिखीते मुद्रण प्रती भर मोजुनीया
खतावणीतिल हिशेब दिसण्या खुल्या अंबरी
खाडाखोडीवरती सुद्धा लिही खरे रे
वळिवाची सर भिजविल पाने तुझी वासरी
मात्रावृत्त (२४ मात्रा)