हसेन चंद्र होउनी स्मरेन मधुर तेच मी
हवा जरी मुकी मुकी दवाळ कुंद पुष्प मी
पुन्हा पुन्हा लिहावयास गझल धुंद नाचरी
उधाणता समुद्र लाट गाज मुक्तछंद मी
असेल वृत्त बंद वा ललित सलिल झऱ्यापरी
रदीफ काफियासवे भरेन त्यात प्रीत मी
सतेज बिंब लोचनात पाहुनी निळे निळे
सखे झरेन पापण्यांत तृप्त मुग्ध थेंब मी
गुरूकुलात मंदिरात प्रार्थनेत मौन त्या
तरूण वृद्ध-आश्रमी असेन बाल खास मी
वृत्त – कलिंदनंदिनी, मात्रा २४
लगावली – ल गा ल गा /ल गा ल गा/ ल गा ल गा/ ल गा ल गा/