खूप मस्त मस्त वाटतंय
देह वस्त्र चुस्त वाटतंय
देणं घेणं संपल्यावरच
केलं सारं फस्त वाटतंय
उरलं सुरलं देत आप-धन
बरसतोय हस्त वाटतंय
रागरंग ओळखतच मन
घालतेय गस्त वाटतंय
मेघ दाटलेत गगनभर
विश्व अवघं सुस्त वाटतंय
आम आदमीच फक्त इथं
लावणार शिस्त वाटतंय
का बरे कुणास आजपण
काव्य माझं स्वस्त वाटतंय
अक्षरगण वृत्त (मात्रा १४)
लगावली – गाल/गाल/गाल/गाललल/