सोडुन दे ना मित्रा काही शब्द बोचरे भोचक आता
वर्तमानिच्या वाऱ्यासंगे लयीत झुळझुळ मोहक आता
जे जे सुंदर तुझेच ते ते असे जाण तू स्वतः स्वतःला
जाणलेस तर तुझ्याप्रमाणे नसेल सुंदर साधक आता
नशेमधे तू तव गझलेच्या राहशील जर त्यागुन मीपण
घडेल तुझियासंगे सुद्धा चर्चा साधक-बाधक आता
चल जाऊया गझलेसंगे रम्य जगी या फिरावयाला
चित्त ठेवण्या प्रसन्न अविरत नकोच चिंता नाहक आता
सौख्याची गडगंज संपदा स्वप्नामधली आली हाती
संपत्तीचे आपण होऊ चालक मालक वाहक आता
गझल मात्रावृत्त (मात्रा ३२)