कवी शायरांची जात स्वाभिमानी
कलम लेखणीची पात स्वाभिमानी
दिव्या जोजवीते वीज होत पेटे
जळे कापुरासम रात स्वाभिमानी
गुणी नाजुकाही जाळतेय भोगा
निळी केशराची वात स्वाभिमानी
फिरे नागिणीसम पेलण्या नभाला
पुन्हा टाकण्याला कात स्वाभिमानी
असा पुत्र गुंडा आणखी पतीही
जणू बत्तिशीचे दात स्वाभिमानी
खुली वाट होण्या ओढती रथाला
खऱ्या सारथ्याचे हात स्वाभिमानी
सुनेत्रा नि मधुरा काव्य रंग भरती
नऊ देव तत्त्वे सात स्वाभिमानी
लगावली- लगागा/लगागा/गालगाल/गागा/
मात्रा- २०