जंतर मंतर शिकण्यासाठी हॅरी पॉटर
करे कशाला जंतर मंतर कॅरी पॉटर
आवडती अक्षरे जुळवुनी चित्र रेखुनी
रंग उधळुनी नाव मिळव तू मॅरी पॉटर
प्राकृत हिंदी माय मऱ्हाटी तिला मायना
प्रिय अथवा प्यारीच लिहूया पॅरी पॉटर
मने प्रफुल्लित होण्यासाठी मैफलीत या
रमू गझल नि शेर शायरीत गॅरी पॉटर
मंत्र जादुई कैक बनविण्या माझी भाषा
मस्त निराळी नारी न्यारी नॅरी पॉटर
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)