एवढ्या गर्दीत होते एकटी
जाहली जाणीव पण ती शेवटी
ते मला म्हणतात ताई का बरे
मी जरी आहे तयांहुन धाकटी
जर रजा आहे हवी तर वाज रे
मोकळे बरसून वेड्या घे सुटी
सर्वजण म्हणतात मजला सावळी
फक्त प्रियला वाटते मी गोरटी
मी तुला सांगेन जे ते ऐक तू
मी खरेतर गोरटी ना गोमटी