घंगाळ – GHANGAAL


दुःखद आहे टाळ तिला
अशक्य मग खंगाळ तिला

निजण्या दे भूमीची चटई
पांघरण्या आभाळ तिला

ओंगळवाणी दिसली जर तर
नको म्हणू वंगाळ तिला

दाभण घेवुन उसवायाचे
प्रश्नांचे जंजाळ तिला

फुटका गळका जुनाट टब तो
स्नाना दे घंगाळ तिला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.