पाऊस सुखाचा श्रावण रे ..
झरझरतो सुख मन भावन रे …
घडीत पाऊस ऊन घडीभर
घडीत अवघड कर्पूर घनसर
सुखद सयींची घडी उन्हावर
गोळा झाले मुठीत अत्तर ……
अत्तर घन रिमझिमता झरझर …
सत्त्यासम श्रावण येतो रे
आषाढ कधी तो होतो रे
भाद्रपदासम दो नेत्रांतून .
घट कलश होऊनी झरझरतो रे … .
हा प्रभाव ओळख आहे रे ….
सत्यासम श्रावण आहे रे …आहे रे ….
.