माझिया पिंडात जे जे तेच ब्रह्मांडात रे
कांडले शब्दांस कारण निर्मिती कांडात रे
तू सुपारी घेतली अन घाव घालुन फोडली
गुण सुपारीचेच अवघे जाण या खांडात रे
मुसळ ना केरात जाते मुसळ हे माझे उभे
म्हण नको शब्दात पकडू घोळ थोतांडात रे
मागते जिव्हा म्हणोनी मांस खाण्या माणसा
मूक प्राण्या मारिशी तू जीव बघ सांडात रे
रे स सुद्धा अर्थ आहे वाद सारे संपवू
आडदांडा फिरवले तर तोच अडदांडात रे
गझल – अक्षरगणवृत्त (मात्रा २७)
लगावली – गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा/