आहे ओंजळ खरी अंजली
नाही मृगजळ खरी अंजली
उठवुन मोहळ खरी अंजली
बनते वादळ खरी अंजली
पाणिपात्र मम भरण्यासाठी
फोडे कातळ खरी अंजली
कधी झुळूक तर कधी भासते
चक्रीवादळ खरी अंजली
आज सुनेत्रा तृप्त जाहली
बनता वाकळ खरी अंजली
गझल – मात्रावृत्त (मात्रा १६)