आयुष्याची सुंदर गाथा स्वतः लिहावी
अनाथांसही करण्या नाथा स्वतः लिहावी
चिमटे सोसत समीक्षकांचे गोष्ट छानशी
स्वतः स्वतःच्या खाउन लाथा स्वतः लिहावी
संतांसम मिळवाया शांती अंतरातली
अभंग ओवी झुकवुन माथा स्वतः लिहावी
ताल सुरातिल धरुनी ठेका गझल लयीतिल
जपता जपता तै तै ताथा स्वतः लिहावी
मायपित्यांसम गुरू मिळाया व्यथा टोचरी
पदपथ अथवा बनवुन पाथा स्वतः लिहावी
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)