दहा दहा रुपयांची नाणी देऊ तुजला फक्त दहा
जपुन ठेव ती चिल्लर म्हणुनी लाविल तुजला शिस्त दहा
दशधर्माची ध्वजा फडकुदे धर्मस्थळांवर मनुजांच्या
सोळा संस्कारे मन भरण्या घालिल आता गस्त दहा
रावण जिनधर्मी संस्कारी स्पर्श न केला सीतेला
आत्मा त्याचा जिनानुयायी नका म्हणू हो स्वस्त दहा
कर आदर तू सत्याचा अन आर्जव शुचिता धर्मांचा
पुरे टवाळी टिंगल चेष्टा करेल तुजला फस्त दहा
अभय व्हावया अभय द्यावया एकेंद्रिय जीवालाही
एक जाहले भरतभूवरी परमेष्ठींचे हस्त दहा
गझल मात्रावृत्त (३० मात्रा)