चला सारे लुटू आता जगण्याची मजा
धो धो धो धो खळाळून हसण्याची मजा
गप्पांमध्ये दंग होत गोष्टी रचूया
गाऊ नाचू गोल फिरू ठेका धरूया
हळूहळू धावू घेऊ फिरण्याची मजा
सागराच्या काठावर वाळूतच लोळू
चिमणीचा खोपा बांधू ऊन खात पोळू
जपून जपून घेऊ धडपडण्याची मजा
कपट लोभ क्रोध अहं शत्रू खरे मारू
शुद्ध स्वच्छ मने करू पुन्हा आता घेऊ
थोडे आम्ही बिघडूनी घडण्याची मजा
चला सारे लुटू आता जगण्याची मजा
धो धो धो धो खळाळून हसण्याची मजा
सेमिसरी गझल – मात्रावृत्त (२३ मात्रा)