जितुकी सोपी तितुकी अवघड आहे माझी जैन गझल
हिमशिखरावर जाऊन बसली सदैव ताजी जैन गझल
आहे हट्टी अवखळ पागल पिसे तिला मम वेडाचे
वेडासाठी प्राण त्यागण्या होते राजी जैन गझल
साधक श्रावक जैन अजैनी पंडित मुल्ला गुरवांच्या
नकळत हृदयी थेट शिरोनी मारे बाजी जैन गझल
मिष्टान्नावर ताव मारण्या बसता सारे मधुमेही
त्यांना वाढे जांभुळ अन कार्ल्याची भाजी जैन गझल
लिहिता गाता देत उजाळा गझलेच्या या इतिहासा
करते गोळा मुक्त काफिया आजी माजी जैन गझल
मात्रावृत्त-(८+१६+६=३० मात्रा)