पाण्यासाठी हवीच सरिता
आकाशीची खगोल गंगा
मातपिता तेथेच राहती
चक्षु माझे तया पाहती
कोण देवता कोनाड्यात
पूजन करण्या तत्वे सात
विद्या सरस्वती जीवनी
जिनवाणी मम आगम देवी
शब्दफुले वाहून पूजला
कोणाडा ही मला पावला
भिंत न खचली गगन चुंबिते
भिंतीवर ज्ञानिये बैसले