आज टमाटे संपव तू
चित्र नव्याने रंगव तू
वहीवरी जे लिहिशी ते
अक्षर अक्षर टंकव तू
द्वेषाचे अन भोगाचे
शिल्प बुभुक्षित भंगव तू
वासनेत ती बुडे जरी
प्रेमाने तिज गंडव तू
तापवणाऱ्या डोक्यांना
सतत बोलुनी भंडव तू
घाण साठता कोंड्याची
पूर्ण कुंतले मुंडव तू
सम्यकदर्शन होण्याला
आत्मियात तिज गुंगव तू
नकोस टाळ्या टाळ पिटू
गझली तव मन दंगव तू
गिटार तबला साथीला
रसिकजनांना तंगव तू
मात्रावृत्त (८+६=१४ मात्रा)