हाय मी वेडी कितीरे समजले वेडा तुला
मस्त तू मैफल गझलची समजले मेळा तुला
खात जाशी गोड सारे आवडीने आजही
जो दिला पेढा तुला मी वाटला पेठा तुला
मी फिदा होतेच तुजवर कालही अन आजही
कान भरण्या ते टपोनी समजले केव्हा तुला
द्यायचा होता तयांना धवल तुज शेला जरी
मी दिलेला जर्द हळदी शोभतो फेटा तुला
मी सुनेत्रा असुनसुद्धा लोक म्हणतीअंध ही
नेत्र मम पायांससुद्धा सांगतो ठेका तुला
अक्षरगण वृत्त – मात्रा २६
लगावली – गालगागा/ गालगागा/ गालगागा/ गालगा/