झोल मज दिसलाच नाही
टोल तर भरलाच नाही
कोठवर असले गं बोलू
गोल तर उडलाच नाही
सांग घन कुठला खरा रे
बोल सत कळलाच नाही
खाप अन वजने तराजू
तोल पण वदलाच नाही
तीर बघ सुटले कितीदा
ढोल ढग फुटलाच नाही
आठवण असली तरीही
कोल तिज म्हटलाच नाही
वावटळ उठली ‘सुनेत्रा’
डोलकर हरलाच नाही
वृत्त – गा गा ल ल, ल ल गा ल, गा गा.