पाठीमागे कर्तव्याचा लकडा होता
पगडीवरती परंपरेचा पगडा होता
स्वप्ने होती नेत्रांमध्ये स्वातंत्र्याची
पुत्र गबाळा जरी भाबडा लुकडा होता
विमान नव्हते बाइक नव्हती पायही नव्हते
वाहन त्याचे दो चाकांचा छकडा होता
उजळ भाल ते उंच नासिका त्यावर ऐनक
असा चेहरा भाव त्यावरी करडा होता
जमीन होती कसावयाला हृदयी श्रद्धा
तब्येतीने धडधाकट अन तगडा होता