निळ्या कागदी श्यामल गझला संगणकात ठेव
अथवा गाडुन त्यांस कुंडीत मातित हात ठेव
जीव अजीव आस्रव संवर बंध निर्जरा मोक्ष
जैन दर्शनातील तत्त्वे ध्यानात सात ठेव
आवडत नसेल वाचन तर लक्ष देऊन ऐक
ह्या कानाने ऐकत ऐकत त्या कानात ठेव
देहबोली नेत्रबोली अनेक बोली शिकून
बोलणं पाहणं ऐकणं चालणं तुझं झोकात ठेव
बोल कौतुके काट्यांसंगे गोष्ट त्यांची ऐक
लिहून त्यांच्या मनोगतास हृदयकोशात ठेव
गझल मात्रावृत्त (मात्रा २६)